अवघ्या एकोणिसाव्या वर्षी जवान निखिल दायमा यांनी आतंकवाद्यांशी लढतांना काल उरी जम्मु काश्मिरमध्ये सर्वोच्च बलिदान दिला.

134

अवघ्या एकोणिसाव्या वर्षी जवान निखिल दायमा यांनी आतंकवाद्यांशी लढतांना काल उरी जम्मु काश्मिरमध्ये सर्वोच्च बलिदान दिला.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान आपला जवान विरगतीला प्राप्त झाला. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. निखिल दायमा असं विरगतीला प्राप्त झालेल्या जवानाचं नाव असून ते राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील सैदपूर गावचे रहिवासी होते.
निखिल दायमा हे भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंटचे जवान होते. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यांना वीरमरण आलं.
आपल्या ह्या विरसुपुत्राला अश्रूपूर्ण श्रद्धांजली💐