बाबुपेठ मधील उल्लेखनीय काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या सफाई व घंटागाडी कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार समारंभ थाटात संपन्न
भाजपाच्या महिला कार्यकर्त्या सौ अर्चनाताई उरकुडे यांचा जन्मदिनानिमित्त अनोखा उपक्रम
चंद्रपुर:- बाबूपेठ मधील सफाई कर्मचारी व घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा काल दिनांक
29/1/2021 रोजी लक्ष्मीनारायण लॉन येथे पार पडला.यामध्ये ज्या सफाई व घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कोरूनाच्या काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून कोरोना युद्ध म्हणून त्यांनी काम केलं अशा सफाई कर्मचाऱ्यांना शाल श्रीफळ व टिफिन देऊन त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.संपूर्ण भारतामध्ये कोरोना ने आपले हातपाय पसरले असल्याने संपूर्ण भारत कोणाच्या जाड्यामध्ये फसला होता.या काळामध्ये सफाई व घंटागाडी कर्मचार्यांनी आपल्या परिवाराची व स्वतःच्या जीवाची परवा न करता सतत काम करत होते. या कार्यक्रमांमध्ये सन्माननीय महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,चंद्रपूर महानगरपालिकेच्या माजी महापौर तथा महिला जिल्हाध्यक्षा अंजलीताई घोटेकर, प्रभागाचे नगरसेवक प्रदीप किरमे, दिवाकर पधटवार सर, युवानेते अमोल नगराडे, साईनाथ उपरे,दौलत नगराळे, नगरसेविका शीलाताई, सभापती कल्पनाताई बगुलकर, किरण बुटले, प्रभा गुडदे गजानन पिंपळशेंडे, मगरे साहेब, आकाश ठुसे यावेळी मंचावर उपस्थित होते, काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत पिंपळशेंडे, संदीप पिंगे, सुंदर खारकर, महेश साळवे, आदित्य आदित्य उरकुडे, सुरज पिंपळशेंडे, सुभाष ढवस , पराते साहेब, आनंद पिंपळकर, विनोद धकाते, छाया खारकर,रेखा चन्ने, बातो ताई, प्रदीप मुलगीलवार, प्रदीप रत्ना वार,चिकनकर काकाजी,यांनी अथक परिश्रम घेतले