कोळसा व्यापारी यांची गोळ्या घालून हत्या
राजुरा शहर मधे राजू यादव यांच्या वर गोळीबार करून हत्या
राजुरा,चंद्रपूर:-
राजुरा शहर मधे नाका नंबर 3 येथे कोळसा व्यापारी राजू यादव हे दाढीकटिंग करीत असताना त्यांच्या वर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून हत्या केल्याची घटना आज सायंकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली.
राजू यादव हा व्यकी मुळ उत्तरप्रदेश येथील असून मागील अनेक वर्षांपासून तो राजुरा येथे कोळसा व्यापार करीत होता. आज सायंकाळी राजुरा येथील नाका नंबर 3 येथे एका सलून मधे गेला असता अज्ञात व्यक्तीनी त्यांच्या वर गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटने मुळे चंद्रपूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे.