ट्रक चालकाला आली डुलकी .. अन् क्षणात त्याच्या डोक्याची कवटीच निघाली

92

ट्रक चालकाला आली डुलकी .. अन् क्षणात त्याच्या डोक्याची कवटीच निघाली…

 

आष्टी –

आष्टी गोंडपीपरी मार्गावरील विठ्ठलवाडा येथे ट्रकचालकाला आलेल्या डुलकीमुळे ट्रक ची उभ्या ट्रकला धडक बसल्याने ट्रक चालकाची कवटीच बाहेर निघाली व तो जागीच ठार झाला. ही घटना दिनांक 24 मे बुधवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली

 

अमिद शेख वय 35 रा. राजपूर ( बोरी) ता.अहेरी जि.गडचिरोली असे मृतक ट्रकचालकाचे नाव आहे.

 

सदर ट्रक क्रमांक MH 33 टी 1882 आलापल्ली कडून बल्लारपूरकडे लाकडे घेऊन जात असताना विठ्ठलवाडा येथील बसथांब्यावर ट्रकचालकाला डुलकी आल्याने एका उभ्या ट्रकला त्याची जबर धडक बसली यात झोपेत ट्रकचालकाचे मुंडके बाहेर निघून असल्याने त्याची कवटीच बाहेर निघाली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच गोंडपिपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. व मृत ट्रक ड्रायव्हर चा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रात्रीच्या सुमारास अनेक ट्रक चालक वाहन चालवीत असतात यात पुरेशी झोप न झाल्याने अशा अपघाताच्या घटना घडतात