*गडचिरोली येथे शासकीय आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

82

*गडचिरोली येथे शासकीय आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ*

*खासदार श्री. अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*

————————————–

*कृषी उद्योगिक खरेदी विक्री सहकारी संस्था कुरखेडा च्या वतीने गडचिरोली येथे धान्य खरेदी केंद्र*

 

दि.२९ मे २०२३

 

गडचिरोली: कृषी औद्योगिक खरेदी-विक्री सहकारी संस्था कुरखेडा च्या वतीने गडचिरोली येथे धान्य खरेदी शासकीय आधारभूत किंमत उन्हाळी धान खरेदी सन -२०२३ अंतर्गत गडचिरोली येथे उन्हाळी रब्बी हंगाम धान खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्राचे उद्घाटन खासदार अशोक जी नेते यांच्या हस्ते आज दिं. २९ मे २०२३ ला धान केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

 

शासकीय आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी खासदार अशोक जी नेते यांनी केले.

 

यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते, यांच्यासोबत भाजपा युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, उपसभापती डॉ. बळवंत लाकडे,संचालक लक्ष्मीकांत कुंभारे,अध्यक्ष खरेदी विक्री कुरखेडाचे व्यंकटिजी नागीलवार,उपसभापती खरेदी विक्री हरिचंद्र डोंगरवार,तज्ञ संचालक खेमनाथ डोंगरवार, शेतकरी संतोष देशमुखे,सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती नरेंद्र राखडे, व्यवस्थापक सुधाकर वैरागडे,तसेच बरेच संख्येने उपस्थित होते.