राजु यादव हत्याकांडातील आरोपींना अटक.
अवघ्या काही तासातच कोळसा व्यवसायिक राजू यादव हत्याकांडातील आरोपींना अटक
राजुरा:-
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात वर्दळीचे ठिकाण असलेल्या नाका नंबर ३ येथील मयूर सलूनमध्ये कटिंग करीत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी कोळसा व्यवसायीकाची देशी कट्याने गोळ्या झाडून हत्या केल्याची थरारक घटना घडली. राजू यादव (वय ४५) असे ठार झालेल्या कोळसा व्यावसायीकाचे नाव आहे. ही घटना आज (दि.३१) सायंकाळी ६:०० च्या सुमारास घडली असून घटनेच्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अज्ञात मारेकऱ्यांचा नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग केला, परंतु ते दुचाकी रस्त्यात सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर व्यावसायिकांची हत्या कोळसा तस्करीतून झाली असावी असा अंदाज वर्तविल्या जात आहे. राजुरा शहरातील नाका नं. ३ हे वर्दळीचे ठिकाण असून येथे अवैध व्यवसाय वाढीस लागत आहेत. या घटनेनेने भितीमय वातावरण निर्माण झाले असून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. राजुरा पोलीसांनी कोळसा व्यावसायिकांचा मृतदेह ताब्यात घेवून आरोपीला पकडण्याची कारवाई रस केली होती.
आरोपी चंदन सितलाप्रसाद सिंग ( वय ३० ) जवाहर नगर, सत्यंद्र कुमार परमहंस सिंग ( वय २८ ) हनुमान नगर रामपूर अशी असून यावर कलम ३०२ , ३४ भादंवि ७/२७ नुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे . घटनेप्रसंगी आरोपींनी वापरलेली दुचाकी एम एच ३४ , बी टी २५२४ आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे.
राजुरा पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी नवीन ठाणेदार म्हणून चंद्रशेखर बहादूरे हे रुजू झाल्यावर या हत्याकांडाच त्यांच्यासमोर आवाहन होते मात्र त्यांनी हे आवाहन स्वीकारत आपल्या कार्यतत्परता दाखविली . यादव हे कोळसा व्यापारी असून राजुरा व बल्लारपूर क्षेत्रात कोळसा माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे , या हत्येमागे हा व्यवसाय कारणीभूत असू शकतो अशी माहिती आहे.