गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील वर्ग 4 ते वर्ग 1 ची पदे तातडीने भरा-

150

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील वर्ग 4 ते वर्ग 1 ची पदे तातडीने भरा-

सर्व रुग्णालये अद्यावत करा

खासदार अशोक नेते यांची पालकमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी

गडचिरोली :- दि. 31 जानेवारी 2021

गडचिरोली हा अतिदुर्गम, संवेदनशील व नक्षलग्रस्त जिल्हा असूनही येथे आरोग्याच्या पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने रुग्णासह त्यांचा नातेवाईकांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे . जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग 4 ते वर्ग 1 ची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने रुग्णांना सेवा देण्यास रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गैरसोयीचे होत आहे या बाबीची त्वरित दखल घेऊन गडचिरोली तील महिला व बाल रुग्णालय तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग 4 ते वर्ग 1 ची पदे तातडीने भरण्यासंदर्भात शासन स्तरावर उचित आदेश निर्गमित करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली आहे व यासंदर्भात तात्काळ आदेश काढण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी रेटून धरली.

यावेळी पालकमंत्री महोदयांनी याबाबत उचित कार्यवाही यथाशिग्र करणार असून जिल्ह्यातील रुग्णालये अद्यावत करण्यासाठी उचित पावले लवकरच उचलण्याची ग्वाही यावेळी खासदार अशोक नेते यांना दिली.

पालकमंत्री मा. ना.एकनाथजी शिंदे यांच्या गडचिरोली दौऱ्या दरम्यान जिल्ह्यातील इतर समस्या व मागण्यांबाबतही खासदार अशोक नेते यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विविध मागण्याचे निवेदन दिले.