‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उद्घोषात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’स उत्साही वातावरणात प्रारंभ !
(16.06.2023 – प्रथम दिवस प्रथम सत्र)
गोवा : ‘हलाल’च्या माध्यमातून चालू असणार्या आर्थिक आक्रमणाला उत्तर द्या !, असे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर यांनी केले. ते ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या अर्थात् एकादश ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
* या अधिवेशनात देशविदेशांतून, तसेच भारतातील विविध राज्यांतील 312 हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.
* अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तून एकत्रित आलेली हिंदु शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी जोडली जाईल !’’
* या प्रसंगी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’, या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे भागवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पू. रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता पू. हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
* या प्रसंगी ठाणे (महाराष्ट्र) येथील श्री. दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे : खंड १, निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे श्री. दुर्गेश परुळकर, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.





