Home Breaking News निट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

निट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

103

निट परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव…

 

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम. देशमुख सर यांच्या हस्ते व डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिलजी वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत वडवणी तालुक्यातील नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी – विद्यार्थिनीचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या कार्यक्रमासाठी मा.एस.एम.देशमुख सर हे काही कारणास्तव उपस्थित राहु शकले नाहीत. त्यामुळे शिक्षण महर्षी प्रा.सोमनाथराव बडे यांच्या अध्यक्षतेखाली, तालुका आरोग्य अधिकारी डॉ ज्ञानेश्वर निपटे यांच्या उपस्थितीत वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात सदर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पत्रकार अँड.विनायकराव जाधव (अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद वडवणी) पत्रकार सोनवणे सतीष (मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका सचिव) पत्रकार सुधाकर पोटभरे (माजी अध्यक्ष), पत्रकार शांतीनाथ जैन (कोषाध्यक्ष), पत्रकार ओमप्रकाश साबळे (डिजिटल मिडिया अध्यक्ष), पत्रकार महेश सदरे (सदस्य), पत्रकार हरी पवार (सदस्य), पत्रकार शंकर झाडे (सदस्य), पत्रकार अतुल जाधव (सदस्य), पत्रकार वाजेद पठाण (सदस्य) सह आदी उपस्थित होते.

Don`t copy text!