भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक एप्रिल-मे 2021 मध्ये

146

भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणूक एप्रिल-मे 2021 मध्ये

आदेश 2 फेब्रुवारी 2021

क्र.रानिआ/मनपा-२०२०/प्र.क्र.३/का-५, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८(१८८८ चा मुंबई ३) च्या कलम १९ (१) (ब), महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ (१९४९ चा मुंबई अधिनियम क्र.५९) मधील कलम ७-अ, महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ (१९६५ चा महा . ४० ) च्या कलम ११, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१(१९६२ चा महा.५) च्या कलम १३ तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८(१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व कलम १२ चे पोट-कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, दिनांक १५ जानेवारी,२०२१ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या, या माहे एप्रिल ते में २०२१ या कालावधीत होणा-या महानगरपालिका, नगरपरिषदा नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचीत करण्यात येत आहे.

मा.राज्य निवडणुक आयुक्त यांच्या आदेशानुसार,