गरीब आदिवासी कुटूंबातील वेद कुळमेथे याला ह्रदय रोगावरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज.

196

गरीब आदिवासी कुटूंबातील वेद कुळमेथे याला ह्रदय रोगावरील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज.
समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येण्याचे डॉ. भारत पांडे यांनी केले आवाहन.

आष्टी- चामोर्शी तालुक्यातील आष्टी आलापल्ली मार्गावरील चंदनखेडी वन येथील गरीब आदिवासी कुटुंब असलेल्या संजय कुळमेथे यांचा 4 वर्षीय मुलगा वेद याला ह्रदयाचा त्रास व पोटात पाणी जमा होत होते.घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने वेदच्या पुढील उपचाराचा खर्च करणे परवडणारे नव्हते.ही बाब ओम विकास बहुद्देशीय संस्थेचे प्रा. डॉ. भारत पांडे व मुधोली येथील जिल्हा परिषद शिक्षक संतोष नागरगोजे यांना कळताच ताबडतोब त्यांनी कुळमेथे कुटूंबियांची भेट घेतली व मनस्वी पांडे हिने आपल्या वाढदिवसा साठी राखून ठेवलेल्या व पाहुण्यांनी दिलेल्या भेटीच्या रकमेतून 7000 रु जमा झाले.व तिने . या 7000 रुपयांच्या रकमेची तातडीने मदत केली.तसेच या वेद ला सत्य साईबाबा रुग्णालय रायपुर छत्तीसगड येथे संतोष नागरगोजे यांनी स्वतः भरती करण्यासाठी गेले.
सत्य साईबाबा रुग्णालयात ह्रदयाची शस्त्रक्रिया मोफत असली तरी इतर औषधोपचारासाठी दीड लाख रुपयांची आवश्यकता आहे.करिता समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास वेदच्या कुटूंबियांस मोठा आधार होणार आहे.करिता ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी ओम विकास बहुउद्देशीय विकास संस्था चंद्रपूर चे खालील बॅंक खात्यावर रक्कम जमा करू शकता असे आवाहन ओम बहुउद्देशीय विकास संस्थेचे डॉ. भारत पांडे यांनी केले आहे.
Account Name- Om Vikas Bahuuddeshiya vikas sanstha chandrapur
Bank name-State Bank of India Ashti
Account no.34986474206
IFS Code-SBIN 0013755