एटापल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ता ची बैठक

72

एटापल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ता ची बैठक

 

एटापल्ली:- दिनांक 27 जुलै 2023 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा एटापल्लीचे वतीने हनुमान मंदिर एटापल्ली येथे श्री संतोष खापने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आजच्या बैठकीचे मार्गदर्शक श्री डॉ. बी डी.कोंगरे, प्रा.सी एन. घोंगळे हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.शरद पाटिल, प्रा.एस डी.मंद , डॉ एस. बी. वळसकर, श्री किशोर मलेवार, प्रा .बारसांगडे सर हे होते.

प्रा.सी एन घोंगळें यांनी आपले मार्गदर्शनात ओबीसी समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, राजकिय व आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता आरक्षण महत्त्वाचे भूमिका बजावते असे आपले मार्गदर्शनात सांगितले. तर डॉ. शरद पाटील यांनी ओबीसी समाजाचे घटनात्मक अधिकार यावर मार्गदर्शन करताना ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यानकरीता वसतिगृह लवकरात लवकर सुरू झाले तर या शैक्षणिक विद्यार्थ्याना लाभ मिळण्यास सोईस्कर होईल यावर चर्चात्मक मार्गदर्शन केले. व आजच्या बैठकीत तिरुपती येथे होणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघचे महाअधिवेशनात प्रमुख मागण्या जातीनिहाय जनगणना, केंद्रात ओबीसी चे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे व नॉन क्रोमिलेयर ची अट रद्द करण्यात यावे ही मागणी पूर्ण करण्याकरीता ओबीसी समाज बांधवांनी सहभागी होणे गरजेचे आहे याकरिता बैठकीत नियोजन करण्यात आलें. तसेच एटापल्ली तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांचे समस्या व अडचणी यावर चर्चा करण्यात आलेत. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ची बैठक यशस्वी करण्याकरिता श्री नागराज चीमटपवार तालुका उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा एटापल्ली, श्री वासुदेव चंनकापुरे तालुका सचिव , श्री राकेशभाऊ मुकेरवार तालुका कोषाध्यक्ष, श्री श्रीकांतभाऊ तेलकुंठवार तालुका सदस्य, श्री बजरंगभाऊ मार्गोनवार सदस्य, श्री नाजुकराव निकोडे सदस्य, श्री अतुल वसाके यांनी अथक परिश्रम घेतले. आजच्या बैठकीत गणमान्य ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचे संचालन श्री किशोर मलेवार यांनी केले तर उपस्थीत मान्यवरांचे आभार प्रा. सी एन. घोंगळे यांनी मानले.