Home Breaking News पोंभूर्णा – आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यावर पुल ओलांडताना वाहून गेली कार

पोंभूर्णा – आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यावर पुल ओलांडताना वाहून गेली कार

132

पोंभूर्णा – आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्यावर पुल ओलांडताना वाहून गेली कार

 

कारचालक अजूनही बेपत्ता

 

गोंडपिपरी-

 

पोंभुर्णा – आक्सापूर मार्गावरील बेरडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असताना कार चालविणे चांगलेच महागात पडले असून या पुरात कार वाहून गेली आहे तर कारचालक अजूनही बेपत्ता आहे.

 

अमित गेडाम असे या बेपत्ता कारचालकाचे नाव असून ते पोंभूर्णा तहसिल कार्यालयात पुरवठा सहायक या पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे गोंडपिपरी येथिल शासकिय अन्न पुरवठा गोदामाचा प्रभार होता. ते सकाळी सुमारास पोंभूर्णा येथून गोंडपिपरीकडे जाण्यासाठी कार ने निघाले असता मुसळधार पाऊसामुळे बेरडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत होते. या पाण्यातून त्यांनी कार टाकली परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने कार नाल्यात वाहून गेली. ही कार नाल्यापासून एक किलोमीटर अंतरावर सापडली असून कारचालक अमित गेडाम मात्र अजूनही सापडले नाहीं. घटनेची माहिती कळताच पोंभूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन ते बेपत्ता कार चालक अमित गेडाम यांचा शोध घेत आहे.

Don`t copy text!