गडचिरोली जिल्ह्यातील पळवा-पळवी केलेल्या ग्रा. प.सदस्यांचा सहलीचा मुक्काम वाढला. 4 तारखेला निघणारी सरपंच आरक्षण सोडत रद्द

176

गडचिरोली जिल्ह्यातील पळवा-पळवी केलेल्या ग्रा. प.सदस्यांचा सहलीचा मुक्काम वाढला.
4 तारखेला निघणारी सरपंच आरक्षण सोडत रद्द

गडचिरोली-
जिल्ह्यत नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी 4 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.परंतु उद्या होणारी सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द झाल्याने सत्तेसाठी पळवा पळवी केलेल्या सदस्यांचा मुक्काम मात्र वाढला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती बिगर अनुसूचित क्षेत्रात दर्शवून जिल्हास्तरावरचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते.त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, व सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणात तफावत आली आहे.त्यामुळे 4 फेब्रुवारी रोजी होणारी सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करण्यात आली आहे.लवकरच यासाठीची नवीन तारीख काळविणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
ही सोडत रद्द झाल्याने मात्र सत्तेसाठी पळवापळवी केलेल्या सदस्यांचा मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे.निकाल लागताच गावच्या सत्ता समिकरणाला वेग आला असून विविध राजकीय पक्षांनी आपली सत्ता ग्रामपंचायतीवर कशी बसेल यासाठी विरोधी गटाचे सदस्य आपल्या गळाला लावत सहलीसाठी रवाना केलेत तर काही ठिकाणी पूर्ण बहुमत असलेल्या आघाड्यांनी आपले सदस्य फुटू नये याची काळजी घेत यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी सहलीचा रवाना केले.या सर्वांच्या नजरा 4 तारखेला होणाऱ्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे होत्या परंतु ही आरक्षण सोडत रद्द झाल्याने या सदस्यांचा मुक्काम आणखी काही दिवस वाढला हे निश्चित.