केंद्रीय शास्त्रज्ञांकडून नागभीड तालुक्यातील करडई पिकाची पाहणी.

105

केंद्रीय शास्त्रज्ञांकडून नागभीड तालुक्यातील करडई पिकाची पाहणी.

आज दि ६ फेब्रुवारी :- डॉ प.दे.कृ.वि.अकोला येथिल कुलगुरू डॉ. विलास भाले सर , भारतीय तेलबिया संशोधन केंद्र मधील संचालीका, डॉ सुजाता मैडम ,वरिष्ट शास्त्रद्य डॉ जवाहर लाल व डॉ सतिश राव , यांनी नागभीड तालुक्यातील पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली व तांत्रिक मार्गदर्शन केले, मा.विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर श्री रवींद्र भोसले साहेब व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर डॉ उदय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच करडई पिकाची लागवड करण्यात आली आहे. रब्बी हंगामात हरभरा ,गहू या पिकावरील उत्पादन खर्च दिवसंदिवस वाढत आहे.तेलवर्गीय पिकाची वाढती मागणी लक्षात घेता व आपल्या परिसरात नवीन पीक लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी करडई पिक प्रात्यक्षिक वर भर देण्यात आला. फारच कमी उत्पादन खर्च असलेले, कमी पाण्यात उत्पादन देणारे,काटेरी गुणधर्म मुळे जंगली जनावरांपासून धोका नसलेले, आरोग्यास उपयुक्त व गुणकारी व बाजारभाव सुध्दा योग्य असलेले पीक – करडई ची नागभीड तालुक्यात 360 एकरवर लागवड करण्यात आली.
या पिकाबाबत तांत्रिक मार्गदर्शन व पाहणी करण्याकरिता केंद्रीय शास्त्रज्ञांनी नागभीड तालुक्यातील मौजा नवखला येथील शेतकरी सौ कुंदा गंडाइत , तुकुम येथील शेतकरी श्री अशोक बनकर, जनकापूर येथील शेतकरी श्री तुळशीराम गायधने, आकापूर येथिल शेतकरी श्री भाकरे यांच्या शेताला भेटी देऊन शेतकऱ्याशी चर्चा करून येणाऱ्या अडचणी वर उपाय सुचविले.
पीक पाहणी प्रसंगी तालुका कृषी अधिकारी नागभीड श्री एन व्ही तावस्कर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा )श्री कावळे ,कृषी सहायक/ सेवक श्री चंदनशिवे, श्री धुमाळ, श्री नवले, श्री मोहिते, श्री घुगे, श्री दाडगे हे प्रामुख्याने उपस्थित होते