माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
भाजपा बाबुपेठ मंडळाचा उपक्रम
चंद्रपूर:- प्रत्येक व्यक्ती हा धावपळीच्या जीवनात डॉक्टर,वकील,इंजिनीयर या क्षेत्राकडे वळतो परंतु अंगी असलेल्या सुप्त गुणांचा वापर उपजीविकेचे साधनकिंवा करिअर म्हणून सुप्त गुणांना चालना देण्याची गरज असल्याचे आवाहन बाबुपेठ प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक प्रदीप किरमे यांनी केल. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये अमोल नगराळे यांनी युवकांना संबोधित करताना म्हटले की युवक हा देशाच्या प्रगतीचा कणा आहे पलीकडे मोठ्या प्रमाणात युतीवर विनयभंग, अत्याचार, या घटना वाढत आहे त्यामुळे युवतींनी आत्मरक्षणाचे धडे घ्यावे असे आवाहन अमोल नगराळे यांनी केले. त्यानंतर बाबुपेठ प्रभागामध्ये संगीत खुर्ची, गीत गायन स्पर्धा, चमचा गोळी, रस्सीखेच स्पर्धा, खो खो-इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना उरकुडे, माया पडवेकर, रेखा चन्ने,निर्मला उरकुडे, माया ठाकरे, शशिकला नगराळे, कलिका कुंभारे, शीला निमसरकार, स्वीटी खोब्रागडे, वनिता मेश्राम,वैशाली साखरे, सतिका रायपुरे, निखिल मेश्राम, सुचिता उरकुडे,यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अमोल नगराळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नगरसेवक प्रदीप किरमे यांनी मानले