अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा चांदाळा येथे भविष्यवेधी प्रशिक्षण संपन्न
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत अनुदानित आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षकाचे तीन दिवसीय प्रशिक्षण अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा चांदाळा येथे दिनांक 10 ऑगस्ट 2023 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान संपन्न झाले
प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय प्रभू सादमवार शिक्षण विस्तार अधिकारी माननीय संतोष कन्नाके शाळेच्या मुख्याध्यापिका सौ यशोधरा उसेंडी प्राथमिक मुख्याध्यापक सतीश कुंटेवार तसेच तज्ञ मार्गदर्शक मोहिते सर जायभाये सर बेझलवार सर आदी मान्यवर उपस्थित होते
आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणे व आश्रम
शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या निपुण भारत योजनेच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी आश्रम शाळेतील
अधिनस्त असलेल्या अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण विभागातील तज्ञ
मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनात सध्या सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा
जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणातील तज्ञ मार्गदर्शकांनी दिलेल्या ज्ञानाचा फायदा घेत शिक्षकाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःपासून सुरुवात करत विद्यार्थी शिक्षणाच्या नवनवीन संकल्पना आत्मसात करण्यासाठी प्रेरणा दिली जात आहे या प्रशिक्षणाला या प्रशिक्षणात प्रकल्पातील गिरोला चांदाळा जप्तलाई गट्टा तथा मुरमाडी इत्यादी अनुदानित आश्रम शाळेतील माध्यमिक शिक्षकांनी तथा मुख्याध्यापकांनी सहभाग दर्शविला होता कार्यक्रमाचे संचालन श्री ए एम हर्षे तर आभार आभार प्रदर्शन माननीय श्री वाय बी गोगल यांनी केले कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाच्या यशस्वी साठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले





