*दुर्गम भागातील विद्यांर्थ्यांसाठी सरसावले मदतीचे हात* स्वातंत्र्यदिनानिमित्य *जि.प.प्राथमिक शाळा , कमके येथे विद्यांर्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण*
पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत येणाऱ्या जि.प.प्राथमिक शाळा , कमके , या अतिदूर्गम , संवेदनशील , आदीवासीबहुल लोकवस्ती असलेल्या शाळेतील सर्व 40 गरजु विद्यांर्थ्यांना मा.सुरज रविंद्र कीटे , साप्टवेअर इंजिनियर पुणे यांच्याकडून शैक्षणिक साहीत्य नोटबूक , रजिस्टर व पेन चे वितरण करण्यात आले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.रामुभाऊ झूरे, उपाध्यक्षा सौ.चंद्रकला कुमोटी , ग्रामपंचायत सदस्य श्री .महेश कोवासे , पो.पाटील श्री.दुलसा पा.झुरे , शाळा.व्य.समितीचे सदस्य श्री.गणेश कोवासे , रावजी झुरे , सैनु पदा , सविता कोवासे , शिल्पा पुंगाटी मुख्याध्यापक श्री .अविनाश बारसागडे , सहा.शिक्षक श्री.अतुल कुनघाडकर , भिमराव सहारे आदी मान्यवर उपस्थीत होते.
या ऊपक्रमासाठी श्री राजुभाऊ मुर्वतकर , प्राथ शिक्षक कुरुड यांनी पुढाकार घेतला.
शाळेतील गरजु विद्यांर्थ्यांना शै.साहीत्य वाटप केल्याबद्दल श्री राजुभाऊ मुर्वतकर , प्राथ शिक्षक कुरुड व मा.सुरज रविंद्र कीटे , साप्टवेअर इंजिनियर पुणे यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक , विद्दार्थी व पालकांनी आभार मानले.





