Home Breaking News ट्रकची ट्रेलरला धडक    ट्रक चालक जागीच ठार ...

ट्रकची ट्रेलरला धडक    ट्रक चालक जागीच ठार     येनापूर नजीक घडली घटना

154

ट्रकची ट्रेलरला धडक

ट्रक चालक जागीच ठार

 

येनापूर नजीक घडली घटना

 

चामोर्शी

विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक व ट्रेलर च्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना येनापूर नजीकच्या चित्तरंजनपूर येथे दिनांक 28 ऑगस्ट सोमवारी साडे चार वाजताच्या सुमारास घडली.

 

मयूर अलोने वय 24 वर्ष रा. सोमनपल्ली ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक ट्रक ड्रायव्हर चे नाव आहे. तो शासकीय अन्नपूरठा करणाऱ्या गडचिरोली येथील ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवर वाहनचालक होता.

 

येनापूर कडून चामोर्शी कडे जाणारे अन्नपुरवठा करणारा ट्रक क्रमांक MH 34 AV 0198 या वाहनाने वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक MH 40 CM 2885 या वाहनाच्या च्या उजव्या बाजूला मध्यभागी जोरदार धडक दिली. यात ट्रक चालक मयूर अलोने हा जागीच ठार झाला असून ट्रकचा दर्शनी भाग चेंदामेंदा झाला आहे. यात ट्रेलर चे कोणतेही नुकसान झाले नाही.

 

घटनास्थळावर बघ्याची गर्दी झाली असुन घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची पुढील कार्यवाही सुरू आहे

Don`t copy text!