*भ्रष्ट केंद्र सत्तेला धडा शिकविण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज* 

65

*भ्रष्ट केंद्र सत्तेला धडा शिकविण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज*

*जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्रम्हणवाडे यांचे प्रतिपादन*

*कुनघाडा रै येथे काँग्रेसची जनसंवाद सभा*

*कुनघाडा रै :-* जनतेला खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणारी भाजप सत्ता २०१४ पासून केंद्रात सुरू आहे. या सत्तेने समाजात व धर्मधर्मात तेढ निर्माण करून जनतेवर अन्याय केला आहे. य सत्तेच्या काळात गडचिरोली जिख्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही. २०१४ पासून कोणतीच पदभरती झाली नसून, तलाठी भरतीत घोळ करून त्यावर स्थगिती आणली आहे, चालू केंद्र सत्ता जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्याचा विडा उचलला असून,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलाच्या तयारीत आहे देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी कुनघाडा रै येथे येणाऱ्या जनसंवाद यात्रेत सहभागी होऊन काँग्रेसला सहकार्य करून विरोधी भ्रष्ट सत्तेला धडा शिकविण्याची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै येथे जनसंवाद यात्रेदरम्यान जनसभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

सभेला लोकसभा समनवयक तथा प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ नामदेव किरसान, प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ नितीन कोडवते, जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते हरबरा मोरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, काँग्रेस कमिटीचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल कोठारे, माजी जि प सदस्य पितांबर वासेकर, माजी सरपंच अविनाश चलाख, उपसरपंच अनिल कुनघाडकर, आड अशोक चलाख, माजी सरपंच अशोक वासेकर, पुंडलिक भांडेकर, वामन काटवे, मालेरचे ग्रा प सदस्य वसंत चलाख आदी उपस्थित होते.

सभेचे संचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी केले सभा यशस्वी करण्यासाठी रमेश कोठारे,उमेश गझलपेल्लीवार, संतोष गव्हारे, साहिल वडेट्टीवार, बंडू वासेकर, सतीश सातपुते, पियुष गव्हारे, अक्षय सुरजागडे, दिवारक उडाण, शंभू कुकडे यांनी सहकार्य केले सभेला कुनघाडा रै, मालेर, नवेगाव, तळोधी, नवरगाव, काशीपुर, अंकोला, गोवर्धन, बाजाजपेठ आदी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.