तलोधी मोकासा बँक मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आणि ATM मशीन ची सोय उपलब्ध करा
महाराष्ट्र ननिर्माण सेना तलोधी मोकासा कडून गडचीरोली मध्यवर्ती बँक तलोधी शाखा प्रबंधक अधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी मध्यवर्ती बँक गडचिरोली यांना निवेदनाद्वारे मागणी.
तलोधी(मो) – तालोधी मोकसा या गावात बसस्टँड लागत बँक आहे. व तिथे अनेक गावामधील लोकांचे खाते आहेत. व ते लोक बाहेर गाव वरून बँक मधे येतात या शाखेमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे त्यांचे वेडवर काम पूर्ण होत नाहीत. तरि लवकरात लवकर हे पद भरून काडा व आपल्या शाखेतील बँक मध्ये जास्ती प्रमाणात खाते असल्याल्यामुळे इथे ATM ची अतंत्य आवश्यकता आहे. तरि लवकरात लवकर ATM मशीन ची सोय उपलब्ध करा. तरि महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत येथिल मध्यवर्ती बँक तलोधी प्रबंधक अधिकारी मुख्यकार्यकारी अधिकारी मध्यवर्ती बँक गडचिरोली यांची भेट घेत निवेदन दिले. व लवकरात लवकर सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष राजेंद्रजी साळवे,जिल्हा उपाध्यक्ष हरीश भाऊ वलादे चार्मोशी ,तालुका उपाध्यक्ष अंकुशभाऊ संतोषवार, मनसे सैनिक संतोष राजकोंडावर, प्रितेश गांगरेद्दीवार, मनशू सातपुते, आशिष भांडेकर,योगराज गेडाम, ई उपस्थित होते….



