मार्कंडा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी खास.अशोक नेते सरसावले

134

मार्कंडा देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी खास.अशोक नेते सरसावले

सोयी-सुविधासाठी निधी मंजूर करण्याची केंद्र शासनाकडे मागणी

377 अधीन सूचनेनुसार खास. अशोक नेते यांचे लोकसभेत निवेदन

गडचिरोली :- दि. 10 फरवरी

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध तसेच विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी- सुविधा निर्माण करणे व या देवस्थान चा विकास करण्यासाठी या तीर्थक्षेत्रला केंद्रिय पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन सोयी-सुविधा निर्माण करण्याची मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 9 फेब्रुवारी रोजी नियम 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत केली व या पर्यटनाच्या महत्वाच्या विषयाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

लोकसभेत निवेदन करतांना खासदार अशोक नेते म्हणाले, वैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले या ऐतिहासिक पुरातन हेमांडपंथी मंदिर मार्कंडेश्वर ऋषी च्या तपस्येने पावन असून या भगवान शंकराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला 15 ते 20 लाख भाविक येत असतात. मात्र सोयी-सुविधाचा अभाव असल्याने भाविक- भक्तांची गैरसोय होते. आदिवासी बाहुल्य क्षेत्रातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मार्कंडा देवस्थान ला केंद्रीय पर्यटन च्या सूचित समाविष्ट करून या स्थळाचे सौदर्यीकरण करून ये- जा करण्यासाठी पक्के रस्ते, भाविकांना थांबण्यासाठी धर्मशाळा, भक्त निवास, सांस्कृतिक भवन, विश्रामगृहाचे बांधकाम, तसेच शौचालय बांधकाम व शुद्ध पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा निर्माण करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी खासदार अशोक नेते यांनी नियम 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत केली