Home Breaking News *_प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असुन नागरिकांनी अवश्य बघुन लाभ घ्यावा...

*_प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असुन नागरिकांनी अवश्य बघुन लाभ घ्यावा असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले._*

87

*_प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत असुन नागरिकांनी अवश्य बघुन लाभ घ्यावा असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले._*

दि.१६ सप्टेंबर

 

गडचिरोली:-देशाचे लोकप्रिय विश्व गौरव पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस निमित्याने सेवा सप्ताह पंधरवडा कार्यक्रम दि.१७ सप्टेंबर ते ०२ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यँत आयोजित केलेला आहे.

 

या वाढदिवसाच्या निमित्याने उद्या दिनांक १७ सप्टेंबर २०२३ ला देशाचे पंतप्रधान मान. नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

 

१२ बलुतेदार व १८ अलुतेदार या जातीतील शेवटच्या समाज घटकापर्यंतच्या लोकांना विकास व्हावा या उद्देशाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे.

 

याकरिता समस्त नागरिकांनी या योजनेचा स्वरूप समजून घेण्यासाठी आभासी पद्धतीचा कार्यक्रम ठीक. ११:०० वाजता अवश्य प्रक्षेपण बघुन लाभ घ्यावा. असे आवाहन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी केले आहे.

 

आयोजित कार्यक्रम स्थळ:- खासदार श्री अशोक जी नेते यांच्या निवासी पोटेगांव रोड,गडचिरोली.

 

तरी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक यांनी ठिक :-१०:०० वा.हजर राहावे.

Don`t copy text!