*सौ.योगिता पिपरे यांची “भाजपा जिल्हा महामंत्री” पदी नियुक्ती*

108

*सौ.योगिता पिपरे यांची “भाजपा जिल्हा महामंत्री” पदी नियुक्ती*

 

*गडचिरोली:- दि.२६ सप्टेंबर*

 

*भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीची नुकतीच नवनियुक्त जिल्हा कार्यकारींनी जाहीर करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रथमत:च जिल्हा महामंत्री पदी महिला म्हणून सौ. योगिताताई पिपरे यांची निवड करण्यात आली.*

*सौ.योगीताताई पिपरे नगराध्यक्ष असतांना गडचिरोली शहरात अनेक विविध विकासात्मक कामे सामाजिक कामे करून पक्षाचे नाव मोठे केले. महिला आघाडी प्रभारी जिल्हाध्यक्ष असतांना भाजप पक्षवाढीसाठी संपूर्ण जिल्हाभर प्रवास केला. भारतीय जनता पार्टी व महिला आघाडीच्या वतीने जे काम सोपविले ते काम पूर्ण निष्ठेने भाजपवाढी साठी जिल्ह्यात काम केले.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्या कार्याचे फळ म्हणुन पक्षश्रेष्ठींनी त्यांना जिल्हा महामंत्री पद दिले.*

*मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारने नुकताच नारीशक्ती वंदन अधिनियमला संसदेत मंजुरी मिळालेली आहे.यापूर्वी स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण होते परंतु आता विधानसभा व लोकसभेमध्ये सुद्धा महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.*

*गडचिरोली जिल्ह्यांमध्ये यापूर्वी जिल्हा महामंत्री पदी फक्त पुरुषांचिंच वर्णी असायची परंतु सौ. योगीताताई पिपरे या प्रथम महिला आहेत ज्यांची भाजपा जिल्हा महामंत्री पदी निवड झालेली आहे.*

*त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे,वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार,विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,खासदार अशोकजी नेते,आमदार देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजबे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे,जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,रवींद्रजी ओल्लारवार,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांना दिले.*

*जिल्हा महामंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजप पदाधिऱ्याच्या वतीने मुक्तेश्वरजी काटवे,अनिलजी पोहनकर,स्वप्नील वरघंटे,विनोद देवोजवार,केशव निंबोड,सागर सागर कुंभरे,विवेकजी बैस,विलासजी भांडेकर,रामरतन गोहणे,दिलीप चलाख, प्रतीक राठी,आशिष पिपरे, साईनाथ बुरांडे, विलास दशमुखे,हेमंत बोरकुटे,संजय मांडवगडे,आनंद भांडेकर,राजू शेरकि देवाजी लाटकर,हर्षल गेडाम,संजय बोधलकर यांनी अभिनंदन केले.*,

*तर महिला आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,वर्षाताई शेडमाके, कविताताई उरकुडे,मीनाताई कोडाप,प्रतिभाताई चौधरी,अनिताताई रॉय,लताताई लाटकर,अल्काताई पोहनकर,वच्छलाबाई मुंघाटे,लक्ष्मीताई कलंत्री,नीताताई उंदीरवाडे,वैष्णवी नैताम,लताताई लाटकर,कोमल बारसागडे,पुष्पाताई करकाडे,अर्चनाताई निंबोड,रश्मीताई बाणमारे,पुनम हेमके,पल्लवी बारापात्रे,ज्योती बागडे,रूपाली सातपुते तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*