Home Breaking News गडचिरोली वनवृत्तामधील भामरागड वन विभागात वाघाची कातडी जप्त करून दोघांना अटक

गडचिरोली वनवृत्तामधील भामरागड वन विभागात वाघाची कातडी जप्त करून दोघांना अटक

206

गडचिरोली वनवृत्तामधील भामरागड वन विभागात वाघाची कातडी जप्त करून दोघांना अटक

 

महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभागांची संयुक्त कारवाई

तालुका प्रतिनिधी एटापल्ली

 

एटापल्ली: दि. 29.11.2023 रोजी पहाटे 03.00 वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभाग यांच्या संयुक्त चमुव्दारे एटापल्ली ते जिवनगटटा रोडवर वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या शामराव रमेश नरोटे, वय 30 वर्ष रा. वासामुंडी व अमजद खॉ अमीर खॉ पठाण, वय 37 वर्ष रा. एटापल्ली या आरोपीस ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत आरोपीकडून वाघाची कातडी 1 नग, हिरोहोंडा मोटारसाईकल 1 नग, मोबाईल 3 नग असा मुददेमाल जप्त केला आहे. सदर वनगुन्हा प्रकरणी आरोपी शामराव रमेश नरोटे, वय 30 वर्ष रा. वासामुंडी व अमजद खॉ अमीर खॉ पठाण, वय 37 वर्ष रा. एटापल्ली यांचेविरूध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 9, 39, 48, 49, ए 49, बी 50 अन्वये वनगुन्हा क्र. 12/2023, दि. 29/11/2023 प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

 

उपरोक्त कारवाई ही रमेशकुमार वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड वनविभागाचे उप वनसंरक्षक शैलेश मीणा व उदंती सितानदी टायगर रिजर्व छत्तीसगड वनविभाग उप निदेशक वरूण जैन व चमू यांचेव्दारे संयुक्तरित्या करण्यात आली. याबाबत राहूल टोलिया उप वनसंरक्षक आलापल्ली, गणेश पाटोळे, विभागीय वनअधिकारी दक्षता यांचे सहकार्य लाभले. कारवाईत चरण भेडके, वनपरिक्षेत्र अधिकारी ऐटापल्ली, सुशिल हलामी, धनिराम पोरेटी व ईतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रकरणी पुढील तपास अशोक पवार सहायक वनसंरक्षक भामरागड़ यांचेमार्फत सुरू आहे.

Don`t copy text!