Home Breaking News गडचिरोलीत भव्य पदग्रहण सोहळा; विश्वजीत कोवासे यांच्या सत्कारासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र

गडचिरोलीत भव्य पदग्रहण सोहळा; विश्वजीत कोवासे यांच्या सत्कारासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र

8

गडचिरोलीत भव्य पदग्रहण सोहळा; विश्वजीत कोवासे यांच्या सत्कारासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र

26 मे रोजी धानोरा रोडवर शेतकरी मेळावा व भव्य पदग्रहण सोहळ्याचे आयोजन

गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार, 26 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता धानोरा रोडवरील सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या भव्य पदग्रहण सोहळ्याचे तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार राहणार असून विविध राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या सोहळ्यास खासदार नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, आमदार रामदास मसराम, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सत्कारमूर्ती म्हणून विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, कार्यक्रमात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल व विविध फ्रंटल संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Don`t copy text!