Home Breaking News शिक्षक/कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ द्या 

शिक्षक/कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ द्या 

8

शिक्षक/कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ द्या

चामोर्शी:-

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेणे

शिक्षक/कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाचा लाभ मिळावा म्हणून

सतत निवेदने दिली. परंतु शासन व प्रशासनाने निवेदनांची दखल घेतली नाही. ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे

विधान परिषद माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांना निवेदन देऊन खंत व्यक्त केली असल्याची माहिती

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी दिली आहे

 

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक/कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस शासनास करणेबाबत शासननिर्णय ३१/०७/२०१९ अन्वये अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली. अभ्यास गटाची अंतिम बैठक .०६/०३/२०२० रोजी बालचित्रवाणी कार्यालय, पुणे येथे घेण्यात आली. सदर अंतिम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानूसार अभ्यासगटाचा अंतिम अहवाल शिफारशीसह शासनास दि. ०८ मे २०२० रोजी सादर करण्यात आला. शासनाने अभ्यासगटाचा अंतिम अहवाल जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून शिक्षकांना तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. ही बाब खेदजनक असून शिक्षकांवर जाणीवपूर्वक अन्याय करणारी आहे. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड क्षोभ व संताप निर्माण झाला आहे त्यासाठी

राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक/कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करावा अन्यथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल असेही निवेदनातून मागणी केली आहे

Don`t copy text!