Home Breaking News गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांना...

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांना “गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा!”

19

शेतकरी मेळावा, दिग्गज नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

गडचिरोली :

गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सत्कार सोहळ्याचे तसेच भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन मंगळवार, 26 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता धानोरा रोडवरील सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून काँग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. उदयभानुजी चिब, खासदार मा. डॉ. नामदेवराव किरसान, माजी खासदार मा. मारोतराव कोवासे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. शिवराजदादा मोरे, आमदार मा. रामदासजी मसराम, आमदार मा. अॅड. अभिजीतदादा वंजारी, आमदार मा. सुधाकरजी अडबाले, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, वसंतराव पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, संजय ठाकरे, पंचायत राज प्रदेशाध्यक्ष, नवज्योत सिंग सिंधू, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी, महेंद्रमाऊ ब्राह्मणवाडे, अजयजी चिकारा, सागर साळुंखे, रविंद्र दरेकर, अजय कंकडालवार, पंकज गुड्डेवार, राम मेश्राम, बंडू शनिवारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात सत्कारमूर्ती म्हणून अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच शेतकरी प्रश्न, संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय दिशा यावरही या मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

या भव्य पदग्रहण सोहळा व शेतकरी मेळाव्यास काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI, सेवादल तसेच सर्व फ्रंटल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

“गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा!”

Don`t copy text!