श्री रामचंद्र प्रभु मुर्ती व श्री गणेश मूर्ती स्थापन सप्ताह सोहळा सुरूवात.
एटापल्ली दिनांक १७। १। २४पासुन ते दिनांक २२। १। २४पर्यंत श्री रामचंद्र प्रभु व श्री गणेश मुर्ती प्रतिस्थापना परमपूज्य संत अनिल महाराज बामणी जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते व श्री बी. प्रभाकरन (एम.डी.) लाॅइड्स मेटल कंपनी यांच्या उपस्थितीत दिनांक २२। १। २४ला पहाटे ५:००वाजता करण्यात येणार आहे.
त्या प्रित्यर्थ काल दिनांक १७। १। २४रोजी पहाटेच्या ५:वाजतापासुन हभप. सौ. सविता ताई बेलोरकर घाटंजी जिल्हा यवतमाळ यांच्या भागवत कथेने सुरूवात झाली व हभप. श्री रूषीजी पेंदोरकर यांचा संच आवळगाव तहसील ब्रम्हपुरी यांनी रात्री ९:००वाजेपावेतो भजन गायले व सद् भाविक भक्तांना भजनमय केले.
एटापल्ली नगरी ह्या उत्सवाकरीता पुर्ण सजविलेली होती. मंदिर परिसरात प्रत्येक घरासमोर रस्ता व अंगण साफसफाई करून रांगोळी काढली होती. शिवाय पुर्ण नगरी विध्युतीकरण करण्यात येऊन रोषणाई करण्यात आली होती व एकंदरीत वातावरण राममय दिसुन येत होते.
अशा प्रकारे हा सोहळा प्रत्येक दिवशी बदल करून पुर्ण सप्ताह संपन्न भर साजरा होणार आहे.