*प्रभू श्रीराम मंदिर रामनगर येथे प्रमोदजी पिपरे व सौ.योगीताताई पिपरे यांनी राबविले स्वच्छता अभियान*
*गडचिरोली:-२० जानेवारी*
*मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनावरून संपूर्ण देशभरामध्ये दिनांक २२ जानेवारी रोजी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा समारोह निमित्त मठ मंदिराची स्वच्छता अभियान सुरु आहे. त्यानिमित्य लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी स्थानिक रामनगर वार्ड क्र.१९ मधिल प्रभु श्रीराम मंदीर येथे स्वच्छता अभियान राबविले.*
*यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांतजी वाघरे,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,भावनाताई हजारे,देवरावजी भोगेवार,पुष्पांताई मडावी,चंदाताई उडकुलवार,मायाताई मडावी,वरगंटीवार काकु,धात्रकताई,विजय खुणे,शुद्धलवार,अनिल देवोजवार,गुंडावार काकु व प्रभु श्रीराम सेवा सुधार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.*