Home Breaking News *प्रवासी कार्यकर्ता यांनी गावा-गावात जाऊन “गाव चलो अभियान” पूर्ण करावे:- डॉ. रामदासजी...

*प्रवासी कार्यकर्ता यांनी गावा-गावात जाऊन “गाव चलो अभियान” पूर्ण करावे:- डॉ. रामदासजी आंबडकर*

99

*प्रवासी कार्यकर्ता यांनी गावा-गावात जाऊन “गाव चलो अभियान” पूर्ण करावे:- डॉ. रामदासजी आंबडकर*

 

*भाजपा जिल्हा गडचिरोलीची गाव चलो अभियान कार्यशाळा संपन्न*

 

*गडचिरोली:-दि.२८ जानेवारी*

 

*आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गाव संयोजक व प्रवासी कार्यकर्ता गठीत करून मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ९ वर्षांमध्ये केलेल्या जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी. या करिता प्रवासी कार्यकर्ता यांनी प्रत्येक गावा-गावात जाऊन गाव चलो अभियान पुर्ण करावे.असे आवाहन विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबडकर यांनी केले.*

*भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली ची गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन धानोरा रोड वरील महाराजा सेलिब्रेशन सभागृह येथे करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.*

*याप्रसंगी खासदार अशोकजी नेते,जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे,प्रदेश सदस्य रविंद्रजी ओल्लारवार,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,महामंत्री प्रकाशजी गेडाम,किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,जिल्हा उपाध्यक्ष गजानन एनगंधलवार,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,तालुका अध्यक्ष विलास भांडेकर,आनंद भांडेकर,गोवर्धन चव्हाण,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे तसेच जिल्हा पदाधिकारी,तालुका अध्यक्ष,महामंत्री,सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष,सुपर वारीयर्स,बुथ पालक व बुथ प्रमुख उपस्थितीत होते.*

*कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाजपा जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे यांनी केले.*

Don`t copy text!