ओबीसी मोर्चात कुनघाडा जी.प.क्षेत्रातुन हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार
कुनगाळा:-
ओबीसी प्रवर्गाच्या विविध प्रलंबित संविधानिक मागण्या घेऊन ओबीसी समाजाचा महाविशाल मोर्चा 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये कुनघाडा जी.प.क्षेत्रातून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार नुकताच एका सभेमध्ये ओबीसी समाजाच्या बांधवानी केला आहे.
22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने नुकतीच कुनघाडा रै येथे ओबीसी समाज बांधवांची सहविचार सभा घेण्यात आली. सभेमध्ये मोर्चाच्या प्रमुख मागण्या, समाज संघटन , मोर्चाच्या प्रवासाचे नियोजन मोर्चाची प्रचार प्रसिद्धी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील ग्रामीण भागात गावा गावात जाऊन लोकांमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या प्रश्न , आरक्षण व नियोजित मोर्चाबाबद जाणीव जागृती करून हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव मोर्चात सहभागी करून घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी इजि.अनिल कोठारे, अतुलभाऊ भांडेकर, पंकज खोबे, इजि. मनोज चापडे, हर्षद भांडेकर, रमेश कोठारे, पंकज गव्हारे, पियुष गव्हारे, गणेश भोयर, राहुल वडेट्टीवार, निलेश देवतळे, विक्की वासेकर, योगेश भांडेकर, हरिदास पिपरे, कर्णविर टिकले , दुशांत कुनघाडकर आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.







