Home चंद्रपूर वेतन सुसूत्रीकरण नुसार वाढीव मानधन द्या

वेतन सुसूत्रीकरण नुसार वाढीव मानधन द्या

180

वेतन सुसूत्रीकरण नुसार वाढीव मानधन द्या

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन
राजुरा, वार्ताहर
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य कामगारांना वेतन सुसूत्रीकरण लागु झाल्यानंतर अद्यापही वाढीव वेतन अद्याप मिळाले नाही. ही रक्कम तातडीने द्यावी, या मागणी साठी आज कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आज एक दिवस काम बंद आंदोलन केले. येथे तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन पुढे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून आरोग्य कर्मचारी कार्यरत असून त्यांना सेवेत कायम करण्यात यावे,वेतन निश्चिती करण्यात येऊन फरकाची रक्कम देण्यात यावे, या मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये शासनाने वाढीव मानधन देऊन एरिअस देण्याचे मान्य केले होते आणि राज्यातील काही जिल्ह्यात हे वाढीव मानधन दिली जात आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना अजूनही लाभ देण्यात आला नाही. यामुळे शासनाचे लक्ष वेधून मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी, यासाठी आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले. राजुरा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले. मागण्यांचे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील एम.जी.टेकाम यांना देण्यात आला. यावेळी अफसाना पठाण, संगीता ढोके, रेबिका लोणारे, संगीता पिपरे, माधुरी काळे, विद्या जेऊरकर ईत्यादी उपस्थित होते.

Don`t copy text!