*खासदार अशोक नेते यांची ता. कुरखेडा येथे विलास गांवडे यांच्या घरी सदिच्छा भेट…*

53

*खासदार अशोक नेते यांची ता. कुरखेडा येथे विलास गांवडे यांच्या घरी सदिच्छा भेट…*

दि.०३ जानेवारी २०२४

कुरखेडा:-खासदार अशोक नेते हे कुरखेडा या ठिकाणी गांव चलो अभियान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता कुरखेडा येथील भाजपाचे जेष्ठ नेते विलास गांवडे यांची अचानक तब्येत बिघडल्याचे खासदार अशोक नेते यांना कळले या संबंधित दखल घेऊन त्यांच्या स्वगृही जाऊन तब्येतीची विचारपूस करीत आरोग्याची काळजी घ्या. असे सांगून आम्ही आपल्या दुखात सहभागी आहोत.अशी सहानुभुती पूर्वक आरोग्याविषयी विचारपूस केली.

 

यावेळी सोबत जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी वाघरे, लोकसभा विस्तारक प्रमुख बाबुराव कोहळे, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष बबलू भाई हुसेनी,कान्होजी लोहंबरे से.नि.सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते.