*गव्हर्मेंट हायस्कूल जिल्हा परिषद शाळा गडचिरोली यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवाला आजी-माजी विध्यार्थी व शिक्षकवृंद यांनी उपस्थित रहावे.:-इंजि.प्रमोदजी पिपरे*

53

*गव्हर्मेंट हायस्कूल जिल्हा परिषद शाळा गडचिरोली यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवाला आजी-माजी विध्यार्थी व शिक्षकवृंद यांनी उपस्थित रहावे.:-इंजि.प्रमोदजी पिपरे*

 

*गडचिरोली:-दि.३जानेवारी*

 

*शहरातील गव्हर्मेंट जिल्हा परिषद (मा.शा.) गडचिरोली ही ७५ व्या वर्षात पदार्पण करत असुन या निमित्य शाळेतील सत्र १९४८-४९ ते २०२३- २४ चे इयत्ता ५ वी ते १२ वीचे विध्यार्थी-विध्यार्थ्यीनी एकत्र येत आहेत.यानिमित्त रविवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अमृत महोत्सवाचे आयोजन गव्हर्मेंट हायस्कूल गडचिरोली येथे करण्यात आले आहे.*

*महोत्सवानिमित्त सकाळी आठ वाजता प्रभात फेरी सकाळी 10:45 वाजता शाळेची प्रार्थना शिक्षकांच्या सत्कार स्नेहभोजन विद्यार्थ्यांचा परिचय आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला आजी-माजी विध्यार्थी व शिक्षकवृंद यांनी सहपरिवार उपस्थित रहावे. असे आवाहन लोकसभा समन्वयक इंजि प्रमोदजी पिपरे यांनी केले.*