*”प्रत्येक विद्यार्थ्यांने जीवनात कलेची जोपासना केल्यास निश्चितच व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल”:-इंजि. प्रमोदजी पिपरे*
*नगरपरिषद प्राथमिक शाळा लाजेंडा येथे सांस्कृतिक व बाल क्रीडा स्नेहसंमेलन सोहळा संपन्न.*
*गडचिरोली :- दि.८ फेब्रुवारी*
*जीवनात चांगल्या कलेची जोपासना केल्यास मनाची मशागत होते.कलेमुळेच जीवनात आनंद निर्माण होतो. कला जोपासण्याचा छंद लागला तर निश्चितच चांगले उद्दिष्ट विद्यार्थी गाठू शकतात. असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले.*
*संत जगनाडे महाराज नगरपरिषद प्राथमिक शाळा लांजेडा येथे सांस्कृतिक व बाल क्रीडा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.*
*याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे, माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,माजी नगरसेविका बेबीताई चीचघरे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय बोधलकर,मुख्याध्यापक रवींद्र पटले,अविनाश कुकुडकर, शिक्षिका सोनिया जुमनाके,सोनाली ननावरे, देवेंद्र नैताम, झाडे,तुळशीदास नैताम, उद्धव नैताम पालक,विध्यार्थी व लांजेडा येथिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*