*योगासन हा आरोग्य आणि मनःशांतीसाठी उपयुक्त:-सौ.योगीताताई पिपरे*
*महिला पतंजली योग समितीच्या वातीने स्नेहमीलन सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम*
*गडचिरोली :- दि.१० फेब्रुवारी*
*योगामुळे शरीर व मन जोडल्या गेल्याने आपल्या शारीरिक ,मानसिक,भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक व सामाजिक घटकांचा स्वताशी जोडल्या जातो.त्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होऊन सर्वांगीण प्रगती करता येते.योगासनामुळे शरीराच्या अंतर्गत भागांना देखील पुरेशा प्रमाणात मसाज व व्यायाम मिळतो.त्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ स्वस्थ व निरोगी राहु शकते.म्हणून योगासन हा आरोग्य व मनःशांती साठी उपयुक्त आहे.असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*
*महिला पतंजली योग समिती गडचिरोली च्या वतीने स्नेहमीलन सोहळा व हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणुन उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.*
*याप्रसंगी योग समिती जिल्हा प्रभारी किरणताई पवार,निर्मलाताई वैद्य, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संचालिका माधवी दहिकरताई,लीलावतीताई साखरे,शेता सर,माजी नगरसेविका वर्षाताई बट्टे,चचानेताई,पोहरकरताई,वर्षाताई मोडक योग शिक्षिका, योग साधक व महिला भगिनी उपस्थित होते.*