Home Breaking News *नागभीड शहर काँग्रेस कमेटीची सभा संपन्न*

*नागभीड शहर काँग्रेस कमेटीची सभा संपन्न*

115

 

*नागभीड शहर काँग्रेस कमेटीची सभा संपन्न*

*दिनांक १०/०२/२०२४ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान व राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड शहर काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व बुथ प्रमुखांची सभा नागभीड तालुका काँग्रेस कार्यालयात पार पडली. सदर सभेत डॉ. किरसान यांनी निवडणुकीचे प्रमुख पाच घटक, बुथ व्यवस्थापन व “मेरा बुथ सबसे मजबूत” ( बूथ कमिट्यांना मतदान मागण्यापासून ते मतदान करून घेण्यापर्यंत तसेच पोलिंग एजंटच्या जबाबदारी बाबत कामाचे वाटप व प्रामाणिकपणे जबाबदारी पूर्ण करण्याचा ध्यास) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सतीश वरजुकर, प्रणया गड्डमवार, सुनिता ताई डोईजड व एडवोकेट वंजारी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर मार्गदर्शन केले.*

या वेळी नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड शहराध्यक्ष किशोर समर्थ, सेवादल तालुका अध्यक्ष डॉ. रवींद्र कावळे,किसानसेल अध्यक्ष मधुकर बावनकर,विधानसभा महिला अध्यक्ष नीतू गुरपुढे,नागभीड तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष प्रणया गड्डमवार, महिला शहराध्यक्ष सुनीताताई डोईजड,महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेस सहसचिव अमोल वानखेडे, चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोशन ढोक,विजय ठाकरे, दीपक गिरीपूजे, युवक शहर काँग्रेस अध्यक्ष महेश कुरजेकर, नगरपरिषद माजी गटनेते दिनेश गावंडे, माजी नगरसेवक प्रतीक भसीन,रवी बळी,माजी सभापती रेखाताई जगनाडे, आशाताई गायकवाड, योगिता मिसार, सुनंदा माटे, सारिका धारणे, पौर्णिमा बडी, माला मुळे,आरती भोयर, नीलिमा भुरे,ऍंड.वंजारी साहेब, हरीश मुळे, प्रशांत गेडाम, अमृत शेंडे,संपूर्ण शहर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश केला.

Don`t copy text!