*लोकसभेसाठी नव्या दमाच्या नविन चेहर्याची जनतेची मागणी.!*
*अचानक समोर आलेल्या युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम यांच्या नावाला झपाट्याने वाढली पसंती.!*
आगामी लोकसभेची धामधूम जवळपास सुरु झालेली आहे. प्रत्येक पक्षाकडून ऊमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.पदाधिकार्यांचे मत लक्षात घेतल्या जात तर आहेच सोबतच सर्वच मोठे पक्ष खाजगी कंपन्यांमार्फत गुप्तपणे सर्व्हे सुध्दा करवुन घेत आहेत. भाजप सुध्दा किमान ५ ते ६ यंत्रणांमार्फत सर्व मतदारक्षेत्राचा सखोल माहिती मागवत आहेत.देशभरात सध्या भाजपसाठी अनुकूल वातावरण असले तरी महाराष्ट्रात आहे त्या जागा राखणे कठीण आहे याची पक्षाला सुध्दा जाणीव आहे त्यामुळेच महाराष्ट्रात येण केन प्रकारेन जागा राखण्यासाठी व्युहरचना आखणे सुरु असल्याचे दिसते.
चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात विद्यमान खासदारांबाबत जनतेत नाराजी आहेच सोबतच क्षेत्रातील जवळपास सर्वच आमदारांचा सुध्दा असलेला तिव्र विरोध वेळोवेळी ऊघडपणे दिसले आहे.त्यातील काही आमदार सुध्दा लोकसभेच्या रिंगणात ऊतरायला गुडघ्याला बाशींग बांधुन तयार आहेत.जनतेला रुचणारा एकही विद्यमान आमदार नाही हे पक्षश्रेष्टींच्या लक्षात आल्यामुळे नव्या चेहर्यासाठी शोधाशोध सुरु झाल्याचे सुत्राकडून कळते.त्यातच अचानक माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांचे धाकटे बंधू कुमार अवधेशराव यांच्या नावाची जोरदार चर्चा क्षेत्रात सुरु झाली असुन शांत,धीर-गंभीर स्वभाव आणि निष्कलंक पार्श्वभुमीमुळे नाव सर्वांच्या पसंतीस ऊतरत आहे. जागोजागी समर्थकांतर्फे पोस्टरबाजी सुध्दा सुरु झाल्याने सर्वांच्या भुवया ऊंचावल्या आहेत.नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी हेच धोरण पक्षाने स्विकारलेले असल्याने कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
२०१४ पासुन क्षेत्रात काँग्रेस खुप पिछाडल्या गेली त्यातल्या त्यात अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचे कंबरडे मोडले.काँग्रेस कडून डाॅ. नितीन कोंडवते व डाॅ.नामदेव किरसान ही दोन नावांमध्ये रस्सीखेच सुरु आहे शेवटी तिकीट कोणाच्या पारड्यात पडते हे येणारा काळच सांगेल.





