शुल्लक कारणावरून आरोपीने केली आपल्या पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या….
नागभीड तालुक्यातील मौशी येथील घटना.
ब्रह्मपुरी: घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा व दोन मुलींची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची थरकाप उडवीणारी घटना नागभीड तालुक्यातील मौशी या गावात घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पत्नी अल्का तलमले(वय 40), मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20), लहान मुलगी तेजस्विनी तलमले (वय 18)असे मृतांची नावे आहेत.यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे. संशयित आरोपी पती अंबादास लक्ष्मण तलमले (वय 50)याला नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.
. नागभीड पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मौशी येथे अंबादास तलमले कुटुंबासह राहत होते. पत्नी अल्का, मोठी मुलगी प्रणाली, लहान मुलगी तेजस्विनी व मुलगा अनिकेत असे त्याचे कुटुंब होते. अंबादास व त्याची पत्नी अल्का शेतमजुरीचे काम करीत होते. रविवार ३ फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास मुलगा अनिकेत गावातीलच एका हॉटेलात कामाकरिता गेला.यावेळी पत्नी व मुली झोपेत होत्या. मुलगा कामाकरिता बाहेर गेल्याची संधी साधून आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास अंबादासने एका पाठोपाठ एक पत्नी अल्का मुलगी प्रणाली व तेजस्विनी या तिघींवर सपासप कुऱ्हाडीने वार करून जीवाणीशी ठार मारले.
. सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले. संशयित आरोपी अंबादास तलमले याला पोलिसांनी अटक केली आहे. घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांचा खून केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड करीत आहेत. हत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे
…..बॉक्स :- …
आरोपी दोन -तीन महिन्यांपासून सोबत कुऱ्हाड घेऊन झोपत होता. गावात दारू पिऊन धिंगाणा घालीत होता. तसेच गावातील शेजारच्या एका व्यक्तीचे घरातील टीव्ही व आलमारीची तोडफोड सुद्धा केली असल्याचे गावाकऱ्यांनी सांगितले. घटनेच्या दिवशी मृतक एकाच खोलीत झोपलेल्या होत्या. तर आरोपी शेजारच्या खोलीत झोपला होता, घटनेनंतर आरोपीने दाराची कडी आतून लावून पुन्हा आपल्या खोलीत जाऊन झोपला सकाळी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या भावास बाहेर कुणी न दिल्याने त्यांनी लोकांना बोलविले यावेळी खिडकीतून डोकावून पाहिले असता आरोपीची पत्नी व दोन्हीमुली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या विशेष म्हणजे तेजस्विनीची बारावीची परीक्षा असल्याने तिच्या खाटेखाली अभ्यासक्रमाचे पुस्तके आढळून आली.