वैरागडात गुंजणार ‘हर हर महादेव’ चा गजर.. ! महाशिवरात्रीनिमित्य भजन स्पर्धा व महाअभिषेक

116

वैरागडात गुंजणार ‘हर हर महादेव’ चा गजर.. ! महाशिवरात्रीनिमित्य भजन स्पर्धा व महाअभिषेक,

 

सिनेतारका सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार

 

भोलू सोमनानी व मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

 

गडचिरोली :- आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे भोलूभाऊ सोमनानी व मित्र परिवाराच्या वतीने महाशिवरात्री चा सण मोठया उत्साहात साजरा केला जाणार असून महाशिवरात्री निमित्य भजन स्पर्धा व भंडारेश्वर देवस्थान येथे महाअभिषेक सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मराठी सिनेतारका सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. भजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भजन मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन भोलूभाऊ सोमनानी व मित्र परिवारांच्या वतीने करण्यात आले.

 

शुक्रवार 8 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 9 वाजता भंडारेश्वर देवस्थानात महाअभिषेक व 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता महा हवन व पुजा विधी होईल. या कार्यक्रमाला विशेष अतिथी सिनेतारका सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. भजन स्पर्धेचे उद्घाटन 8 मार्च रोजी सांयकाळी 6 वाजता होईल. भजन स्पर्धा वैरागड येथील भोलूभाऊ सोमनानी यांच्या आवारात आयोजीत करण्यात आली आहे

भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या भजन मंडळाला 10 हजार एक रूपये, द्वितीय क्रमांकांचे पारितोषीक 8 हजार एक रूपये, तृतीय क्रमांकाचे परितोषीक 6 हजार एक रूपये चतुर्थ क्रमांकाचे पारितोषीक 4 हजार एक रूपये आणि पाचवा क्रमांक पटकविणाऱ्या भजन मंडळाला 2 हजार एक रूपयाचे पारितोषीक देण्यात येणार आहे. भजन स्पर्धेतील सहभागी मंडळांनी भगवान महादेवाचे किमान एक भजन सादर करणे आवश्यक आहे. भजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भजन मंडळांनी 777 3956844 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन भोलूभाऊ सोमनानी व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.