आधारविश्व फाउंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अध्यक्ष गीता हिंगे यांच्या नेतृत्वात कर्तबगार महिलांचा सत्कार
दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीताताई हिंगे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला.मोठ्या व्यक्तींचे सत्कार नेहमीच केले जाते. परंतु आधारविश्व फाऊंडेशन तर्फे दरवर्षी अश्या महिलांना शोधून त्त्यांचा सत्कार केला जातो की त्यांचे कार्य महान आहे परंतु त्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही.त्यामुळेच आधारविश्व फाऊंडेशन ची गडचिरोली जिल्ह्यात एक वेगळीच छाप आहे.आपल्या अध्यक्षीय भाषणात गीता हिंगे म्हणाल्या ज्या महिलांच्या पतीचे मुलं लहान असतांनाच निधन झाले तसेच ज्या महिलांनी कोणाचाही आधार नसतांना धुनी भांडी, मोलमजुरी करुन, छोटा मोठा उद्योग करुन आपल्या मुलांना घडविले. आपल्या मुलांच्या वाट्याला अपल्यासारखं काम करायची वेळ येऊ नये म्हणून अतिशय हाल अपेष्टा सहन करून उच्च शिक्षण दिले. आज त्यापैकी कुणाचा मुलगा वैज्ञानिक तर कुणाचा सीए तर कुणाचा इंजिनिअर अश्या अनेक मोठ्या पदावर आहेत.अश्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करताना मला मनापासून आनंद होत आहे. सत्कारमूर्ती अर्चना मानापुरे,अरुणाबाई जिलेपल्लीवर, सुनीता आलेवार,सरस्वतीबाई कांबळे व अन्य सत्करमूर्ती उपस्थित होत्या.सत्कार करताना बऱ्याच महिला भाऊक झाल्या होत्या. यावेळी आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे, उपाध्यक्षा डॉ. विना जंबेवार, सचिव सुनीता साळवे,सदस्या विजया मने, सदस्या कांचन चौधरी, धनश्री तुकदेव,मीरा कोलते, प्रीती मेश्राम, अंजली देशमुख, संगीता राऊत, गायत्री गेडाम,सीमा कन्नमवार,प्रतिमा सोनवणे, भारती खोब्रागडे, मंगला कारेकर, नम्रता कुत्तरमारे, प्रीती उरकुडे व अन्य सदस्या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विना जंबेवार, प्रास्ताविक सुनीता साळवे तर आभारप्रदर्शन विजया माने यांनी केले