*अतिदुर्गम भागातील शाळांना सहाय्यक गटविकास अधिकारी यांचे भेट*
एटापल्ली:-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शाळांना शनिवारी दिनांक 16 मार्च 2024 ला सकाळ पाळीत शाळा असताना सुद्धा सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.श्रीकृष्ण पेंदाम, पवार साहेब यांनी भेट देऊन पाहणी केले आहे,
गट्टा केंद्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालय गट्टा येथे भेट देऊन वसतिगृहातील निवास व्यवस्था, कोटीगृह, स्वच्छता गृह,स्वयंपाक गृह इत्यादी बाबींची पाहणी करून स्वच्छता राखण्यासंबधी मुख्याध्यापकाना सल्ला दिला,विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष देण्यासाठी शिक्षकांना सूचना दिले,
त्यानंतर गट्टा पासून जवळच असलेली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा येथे भेट देऊन पाहणी केले,या शाळेतील विविध उपक्रम बाबत माहिती जाणून घेतले,माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात ही शाळा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे ही बाब उल्लेखनीय आहे असे ते म्हणाले,या शाळेरील विद्यार्थ्यां सोबत हितगूज केले,सर्व शालेय प्रशासनाचे निरीक्षण करून शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे अभिनंदन केले, यावेळी श्री,अशोककुमार कोवे गटसमन्वयक गट साधन केंद्र एटापल्ली, श्री,एम,सी,बेडके केंद्र प्रमुख गट्टा उपस्थित होते.