उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वात खा.नेते भरणार नामांकन ना.मुनगंटीवार, ना.धर्मरावबाबा राहणार उपस्थित

85

उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या नेतृत्वात खा.नेते भरणार नामांकन ना.मुनगंटीवार, ना.धर्मरावबाबा राहणार उपस्थित

 

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते मंगळवारी (दि.२६) लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.बंटी भांगडिया,माजी आमदार अतुल देशकर,माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम, यांच्यासह महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

 

सकाळी ११ वाजता खा.नेते यांच्या निवासस्थानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली काढली जाईल. केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आणण्यासाठी आणि महायुतीच्या विजयाचा संकल्प करत ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन दाखल केले जाणार आहे.

 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,जिल्हाध्यक्ष ॲड.येशूलाल उपराडे,जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार,संजय गजपुरे,भारत खटी,प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सदानंद कुथे,गोविंद सारडा, योगिता पिपरे,किसान आघाडीचे रमेश भूरसे,जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे,जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.

 

लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता खा.अशोक नेते यांच्या निवासस्थानी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, लोकसभा निवडणुक प्रमुख किशन नागदेवे यांनी केले आहे.