महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिन व मतदार जनजागृती मेळावा

57

चामोर्शी दिनांक 30 -3- 2024 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली तर्फे जागतिक महिला दिन व मतदार जनजागृती मेळावा जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी च्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय राधा शिंदे मॅडम यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीच्या महिला आघाडी प्रमुख मा. सौ . मृणाल तुम्पल्लीवार, उद्घाटक म्हणून चामोर्शी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा. राधा शिंदे आणि प्रमुख अतिथी म्हणून मा. अॅडव्होकेट प्रेमा आईचवार, मा आरती भिमनवार, मा कोमल सेलूकर होत्या याप्रसंगी उद्घटक मा. शिंदे मॅडम यांनी स्त्रिया वरील अत्याचार व त्याचे निर्मूलन यावर मार्गदर्शन केले. अॅडवोकेट प्रेमा आईंचवार यांनी स्त्रिया वरील कायदे यावर प्रकाश टाकला. आरती भिमनवार यांनी महिला सक्षमीकरण यावर भाष्य केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ मृणाल तुम्पल्लीवार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत महिलांचे योगदान त्यात प्रामुख्याने परिषदेच्या पहिल्या महिला आमदार स्वर्गीय संजीवनीताई रायकर मॅडम ने महिलांकरिता शासनाशी संघर्ष करून महिलांना मिळवून दिलेल्या हक्कांबद्दलची माहिती दिली आणि मतदार जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करीत असलेल्या शिंदे मॅडम यांचा त्याचप्रमाणे कवयित्री सौ भारती तितरे यांनी लिहिलेल्या ‘जीवन गाणी ‘या पुस्तकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते मतदार जनजागृती पत्रकाचे विमोचन करण्यात आले आणि उपस्थितांना वाटण्यात आले.

या कार्यक्रमाचे संचालन सौ नम्रता मारतीवार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ कुसुम सावसागडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार सर,जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष नुतीलकंठावार सर, जिल्हा कार्यवाह सागर आडे सर व समस्त जिल्हा पदाधिकारी व चामोरशि तालुका पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.