नागपूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.चंद्रशेखर पाखमोडे यांचे दुःखद निधन

12

नागपूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.चंद्रशेखर पाखमोडे यांचे दुःखद निधन

नागपूर -वृत्तवानी न्यूज

नागपूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.चंद्रशेखर पाखमोडे यांचे आज सकाळी आठ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

रुग्णसेवेलाच जीवनधर्म मानणारे,असंख्य रुग्णांना नवजीवन देणारे अत्यंत कुशल,अभ्यासू व सेवाभावी डॉक्टर आज आपल्यातून निघून गेले.

त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आणि भुषावह आहे.25 वर्षाहून अधिक काळाच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी आपल्या अचूक निदान,

शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि रुग्णांशी असलेल्या आपुलकीपणा,विश्वासपूर्ण संवादातून असंख्य रुग्णांना जीवदान दिले. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबालाच नव्हे,तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील मोठी व कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.

विदर्भातील वैद्यकीय विश्वाने एक अत्यंत न्यूरोसर्जन गमावला आहे.