*जिओची सेवा तत्काळ सुरळित करा;आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.धर्मरावबाबांचे निर्देश*
*सिरकोंडा परिसरातील सेवेबाबत संबंधितांना खडे बोल*
सिरोंचा (प्रतिनिधी)
तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यास अडचणी येऊ नये या उदात्त हेतूने तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या सिरकोंडा, गंगनूर, कोत्तागुडम या तीन गावांत खासगी कंपनीचे जिओ मोबाइल टॉवर उभारण्यात आले़ मात्र अनेक महिने लोटूनही सदर टॉवर सुरु न झाल्याने सिरकोंडा परिसरातील नागरिक या खासगी कंपनीच्या मोबाईल सेवेपासून वंचित आहेत. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे़ ही समस्या लक्षात घेत *माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आ़ धर्मरावबाबा आत्राम* यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना खडे बोल सुनावित तत्काळ सेवा सुरळित सुरु करण्याचे निर्देश दिले़
तालुक्यातील सिरकोंडा परिसरातील नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासह इंटरनेट सुविधाचा लाभ मिळावा यासाठी या भागात खासगी कंपनीची जिओ सेवा सुरु करण्यात आली़ याकरिता *सिरकोंडा, गंगनूर,कोत्तागुडम या गावात जिओ टॉवरची उभारणीही करण्यात आली़ मात्र टॉवर उभारुन अनेक महिन्याचा कालावधी लोटूनही सदर सेवा सुरु झालेली नाही़ परिणामी सदर जिओ टॉवर केवळ शोभेची वस्तू बनली आहे. सिरकोंडा परिसरातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेत *राकाँचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम तसेच सिरकोंडा ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण गावडे* यांनी सदर समस्या थेट *अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम* यांचेसमोर मांडली़ यावेळी आमदार महोदयांनी तत्परता दाखवित जिओ कंपनीच्या व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनीद्वारे थेट संपर्क साधित त्यांची खरडपट्टी काढली़ या भागातील नागरिकांची समस्या लक्षात घेत तत्काळ टॉवर सुरु करुन सुरळित सेवा देण्याचे निर्देश दिले़ यावेळी *जिओ कंपनीच्या व्यवस्थापकांनी एक महिन्याच्या आत टॉवर सुरु करुन सुरळित सेवा देण्याचे आश्वासन दिले.* आमदार महोदयांच्या मध्यस्थीने लवकरच या भागात जिओची सेवा सुरु होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़.
यावेळी *राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच लक्ष्मण गावडे, सरपंच अजय आत्राम, सरपंच सूरज गावडे, उपसरपंच मुल्ला गावडे, सुरेश जाडी, समय्या वरसे, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश रच्चावार* उपस्थित होते.





