*जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा जिवनगट्टा येथील विद्यार्थी हिमांशू नरोटी ह्याचा जवाहर नवोदय विद्यालयात निवड*

32

*जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा जिवनगट्टा येथील विद्यार्थी हिमांशू नरोटी ह्याचा जवाहर नवोदय विद्यालयात निवड*

 

एटापल्ली तालुक्यातील जिवनगट्टा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारा हिमांशू रविंद्र नरोटी ह्याचा नुकतीच घोषित झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली.

 

हिमांशू हा अतिशय बुद्धिमान, हुशार, संयमी व शांत विद्यार्थी आहे. महत्वाचं म्हणजे हिमांशू चे आईवडील शेतकरी आहेत त्याने कोणत्याही शिकवणी वर्ग न लावता परीक्षा पास केली आहे. नवोदय परीक्षेसाठी त्यांच्या शिक्षकांनी उत्तम कामगिरी केली. त्याची जिद्द आणि चिकाटी पाहून हिमांशू ला घडवण्यात तिच्या पालकांची महत्त्वाची भूमिका आहे.

 

त्याचा यशाचे श्रेय त्यांचे शिक्षक, आईवडिल, मोठे बाबा आणि काकांना दिला आहे.

 

गावातील सर्वांनी हिमांशूला या यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच हिमांशू ला अतुलनीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.