*आलापल्लीत महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन, ना.धर्मरावबाबा आत्राम, खा.नेते यांची उपस्थिती !*

45

*आलापल्लीत महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन, ना.धर्मरावबाबा आत्राम, खा.नेते यांची उपस्थिती !*

 

*भामरागडमध्ये जाहीर सभेला मार्गदर्शन !!*

 

*गडचिरोली :* महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांच्या विजयासाठी युतीमधील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी कामाला लागले आहेत. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धर्मरावबाबा आत्राम आपल्या अहेरी क्षेत्रात महायुतीला लिड देण्यासाठी खा.नेते यांच्यासोबत ठिकठिकाणी प्रचारदौरा करत आहेत. गुरूवारी (दि.४) दक्षिण गडचिरोलीचे केंद्र असलेल्या आलापल्ली येथील वेलगुर रोडवर प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय भामरागड येथे जाहीर सभा घेण्यात आली.!

 

आलापल्ली येथील ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर घेतलेल्या बैठकीला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर अरिगेला, मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मदने, जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, युवा नेते सागर डेकाटे, रहीमा सिद्धीकी, पुष्पा अलोने, पोर्णिमा ईस्टाम तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

 

*भारताला अग्रेसर ठेवण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाची गरज- ना.धर्मरावबाबा आत्राम*

 

भामरागड येथे भगवंतराव आश्रमशाळेच्या पटांगणात महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या निमित्ताने भामरागड शहरातील चौकापासून ते सभा स्थळापर्यत आदिवासी परंपरेनुसार वाजतगाजत ढोलताशाच्या गजरात ना.धर्मरावबाबा आत्राम आणि खा.अशोक नेते यांचे स्वागत करण्यात आले.!

 

यावेळी मार्गदर्शन करताना ना.धर्मरावबाबा म्हणाले, जगात भारताला एक नंबरवर आणायचे असेल तर मोदीजीच पंतप्रधान होणे गरजेचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, महिलांना योग्य न्याय देणारे सरकार आहे. एससी, एसटीला अधिकार देऊन न्याय देणारे सरकार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महायुती बनवली आहे. त्यामुळे या महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोक नेते यांना निवडून आणण्याचा संकल्प करू, असे ते म्हणाले.!

 

महायुतीचे उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी ही निवडणूक तुमच्या-आमच्यापासून जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे भवितव्य ठरवणारी आहे‌. या देशाला प्रगतीपथावर आणि सुजलाम्, सुफलाम् बनवायचे असेल तर पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान बनवायचे आहे, असे सांगत गेल्या वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली.!

 

या सभेला प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, भारागडच्या नगराध्यक्ष रामबाई कोमटी महाका, भाजपा तालुकाध्यक्ष अर्जुन बापुजी आलाम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लालसू आत्राम, जेष्ठ आदिवासी सेवक सबरबेग मोगल, तालुका महामंत्री तपेश हलदार, तालुका शहराध्यक्ष सम्राट मल्लीक, तालुका उपाध्यक्ष जाधव हलदार, माजी सभापती निर्मला साळवे, तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.!!