*खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल यांचेकडून*  *उमेदवारांच्या खर्च लेख्याची तपासणी*

23

*खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल यांचेकडून*

*उमेदवारांच्या खर्च लेख्याची तपासणी*

 

गडचिरोली, दिनांक 8 एप्रिल :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक अंतर्गत 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक एस. वेणू गोपाल यांनी आज उमेदवारांच्या खर्च लेख्याची तपासणी

केली.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवार व राजकीय पक्ष यांनी निवडणूक खर्च करणे व त्यांबाबतच्या नोंदीचे लेखे अद्यावत ठेवणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्री एस.वेणू गोपाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निरीक्षक कक्षात उमेदवारांच्या निवडणुक खर्च लेख्यांचे निरीक्षण केले. यावेळी निवडणूक खर्चाचे नोडल अधिकारी हेमंत ठाकूर, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा अधिकारी रमेश मडावी व खर्च निरीक्षण पथक तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

00